sawada

सावदा येथे शाळेच्या नावावर बांधलेली इमारत बेकायदेशीर तक्रार वरून सावदा पालिकेने बजावली नोटीस

सावदा येथे शाळेच्या नावावर बांधलेली इमारत बेकायदेशीर तक्रार वरून सावदा पालिकेने बजावली नोटीस
युसुफ शाह सावदा
सावदा : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे मस्कावद रोड लागत गट क्रमांक 1344 च्या जागेत इमारत बांधकाम संदर्भात कोणत्याही संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून बांधकाम परवानगी न घेता स्थानिक प्रशासनाच्या नाकाखाली शाळेच्या नावावर सर्व नियम अटी धाब्यावर ठेवून स्वतःच्या समरी पावर मध्ये एका नामवंत व धनाट्या जागा मालकांनी एक भव्य दिव्य इमारत उभारलेली आहे
यासंदर्भात सावदा नगर परिषदेत तक्रार झाल्यावर मुख्य अधिकारी श्री सौरभ द जोशी यांनी गट नंबर1344 च्या मालकास नगरपरिषद अधिनियम 1965 व टाऊन प्लानिंग च्या विविध कलमाखाली नोटीस दिलेली आहे सदर जागेला एन, ए ,बिनशेती ची परवानगी नसताना तसेच पालिका प्रशासना कडून बांधकाम परवानगी प्राप्त न करता गट नंबर 13 44 च्या जागेत अनधिकृतरित्या बांधलेली इमारती संदर्भात कोणत्या व कशा स्वरूपात कारवाई केली जाईल की प्रशासन याकडे फक्त बघ्याची भूमिका घेऊन मैंन ठेवतील ? हा यक्षप्रश्न सर्वांना पडलेला असून सर्वांचे लक्ष ही लागलेले आहे ( बातमी भाग क्रमांक 1 )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button