Amalner

Amalner : चोऱ्यांचे सत्र : तालुक्यात चोरांची टोळी सक्रिय…एकाच रात्री सत्ते पे सत्ता… तालुक्यात खळबळी सह दहशतीचे वातावरण..!

Amalner : चोऱ्यांचे सत्र : तालुक्यात चोरांची टोळी सक्रिय…एकाच रात्री सत्ते पे सत्ता… तालुक्यात खळबळीसह दहशतीचे वातावरण..!

अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात चोरट्यांनी एकाच रात्री किराणा दुकानासह 7 घरे फोडून सुमारे 1 लाख 80 हजाराचा ऐवज लंपास केला असल्याची घटना दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, मांडळ येथील महेश जैन यांच्या किराणा दुकानातून अंदाजे 25 ते 30 हजार रु. माल, निलेश पाटील यांच्या कृषी केंद्राचे कुलूप तोडून लॅपटॉप व रोख रक्कम 30 हजार, वाल्मिक पाटील यांच्या रेशन दुकानातून यांच्या गोदामातून ज्वारी, गोणी 3000 रोख रक्कम, अमोल सोनार यांच्या दत्तात्रय ज्वेलर्स दुकानातून 400 ग्राम चांदी, 16 ग्राम सोने, 2000 रु रोख, कमलाकर अहिरराव यांच्या ज्वेलर्स 7000 रु रोख असा मोठा दरोडा टाकत अज्ञात चोरट्यानी 7 दुकाने फोडली आहेत.घटना स्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिसांनी भेट दिली असून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपासासाठी जळगाव येथून ठसे तज्ञ पथक पाचारण करण्यात आले असून
जळगाव येथून सहाययक पोलीस निरीक्षक कांबळे, पी. एन. पाटील, हेडकॉन्स्टेबल चौधरी यांचे ठसे तज्ञ पथक घटनस्थळी दाखल झाले होते. यावेळी दुकाने व घरांमधून विविध वस्तू वरील ठश्यांचे नमुने घेण्यात आले आहेत.

या चोरट्यांनी आधी वावडे येथील चारचाकी चोरून मग दुकाने, घरे फोडल्याचा संशय आहे. वावडे येथील प्रकाश ज्ञानेश्वर धोबी यांची चारचाकी (एम एच १९ ए एक्स १७) ही जवखेडा रस्त्यावर कृष्ण मंदिराजवळ लावलेली होती. अज्ञात चोरट्यानी ती चोरून नेल्याचे दि 11 रोजी सकाळी निदर्शनास आले. व त्यानंतर मांडळ येथील चोऱ्यांची माहिती मिळाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button