भिलाली गावात सर्रास हातभट्टी दारू विक्री विक्रेत्यांनी केले कहर
ग्रामपंचायतला लागली झोप
प्रशासन करणार का कार्यवाही
रजनीकांत पाटील
अमळनेर : पारोळा ता.भिलाली
जगभरात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असता अशा बिकट परिस्थितीत नागरिक आपला जीव मुठीत धरून घरात बसले आहेत.आरोग्या धोक्यापासून वाचाव म्हणून तोंडाला मास्क चा वापर करत अत्यावश्यक सेवे साठी च बाहेर पडत आहे. गरीब जनतेला अन्नधान्य मिळावं या साठी काही शासन उपायोजन करत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते तरुण पिढी लोकांना अन्न घसरपोच मिळावं या साठी हेलपाट करत आहे.
अत्यावश्यक सेवाच शासनाने सुरू ठेवली आहे. अशा बिकट परिस्थितीत देखील काही लोक तर वेगळाच फायदा घेत लूट करत खिसा भरत आहे पारोळा तालुक्यातील भिलाली परिसरात हातभट्टी दारू विक्रेत्यानी कहर केले असून गावात नागरिकांना व्यसनाधीन करत नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालवत आहे.
भिलाली परिसरात अध्यापही दारू बंद होण्याचे काही नावच नाही. हातभट्टी दारू पाडणारे रोज आपली जागा बदलवतात दारू तयार करण्याचे काम सुरू ठेवतात
गावातील सरपंच ग्रामपंचायत यांनी चांगलीच बघाची भूमीका घेतली असून दारू विक्रेत्यानंवर कुठलीही कार्यवाही नाही या बाबत काहीतरी गोलमाल तर नाही असा प्रश्न उपस्थित होतो दारू बंद करने बाबतीत नागरिकांनी बऱ्याच वेळा ओरड उठवली असता कोणीही लक्ष देण्यास तयार नाही प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.






