Pandharpur

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या गणेश दत्तू वाघमारे यांची निवड

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या गणेश दत्तू वाघमारे यांची निवड

प्रतिनिधी रफिक आत्तार

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची आज पंढरपूर येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील व तालुक्यातील महिला, युवती ,युवक, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार,समाजसेवक यांच्या अध्यक्षतेखाली आपण जनसामान्यांचे,अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर, विद्यार्थी व विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे म्हणाले यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी गणेश दत्तू वाघमारे यांची एकमतानी निवड करण्यात आली.

यावेळी निवडचे पत्र देताना समाजसेवक संतोषजी कवडे शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपजी मुटकुळे,शिवबुध्द युवा संघटनेचे सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष विजयकुमार पांडूरंग साठे,यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी अजिंक्य वाघमारे, शहाजी शिंदे,बनू लटके,चैतन्य शिंदे, किरण शिंदे,राजू थिटे, रोहित फावडे,गणेश पवार, निखिल दुरलैकर,इत्यादी उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button