Dhule

निसर्ग मित्र समिती, धुळे तर्फे महाराष्ट्र कृषी दिना निमित्ताने प्रगतीशील शेतकरी म्हणून मुकटी येथील श्री. राजेंद्र शर्मा यांचा आदर्श शेतकरी म्हणून सन्मानीत करण्यात आले..

निसर्ग मित्र समिती, धुळे तर्फे महाराष्ट्र कृषी दिना निमित्ताने प्रगतीशील शेतकरी म्हणून मुकटी येथील श्री. राजेंद्र शर्मा यांचा आदर्श शेतकरी म्हणून सन्मानीत करण्यात आले..

राहुल साळुंके धुळे

धुळे : महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती, सावता निसर्ग फॉर्म व मनिषा मसाले धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि १ जुलै हरीत क्रांतिचे जनक माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त वृक्षारोपण ,महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा गोंदूर येथील प्रगतीशील वनश्री व उद्यानपंडीत विलासराव माळी यांच्या शेतात संपन्न झाला,
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भोकरचे आदर्श शेतकरी गोपीचंद बुधा पाटील,उद्योजक किशोर डियालाणी,मनिषा मसाले चे संचालिका उद्योजिका सौ मनिषा डियालाणी, निसर्ग मित्र समिती चे राज्य संघटक प्रभाकर सूर्यवंशी,आदी मान्यवर उपस्थित होते,यावेळी प्रथम हरीत क्रांतिचे जनक कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे व वृक्षांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,तर धुळे तालुक्यातील प्रगतीशील व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मानपत्र,शॉल,वृक्ष,गुलाब पुष्पं देऊन सन्मान करण्यात आला,यात देवराम आधार सर पाटील(बोरीस), राजेंद्र अहिरे (निमगुळ), प्रमोद बापू तुळशिराम खोंडे( फागणे),देविदास वसंतराव पाटील(निमगुळ),अधिकार दगा पाटील( बिलडी),रमेश मुरलीधर भामरे( मेहेरगाव),मनोज संतोष पाटील(बिलाडी, प्रा विद्याताई एस वाघ( धुळे), प्रकाश आनंदा मराठे( बाळापूर),सुयोग अनिल पाटील( कापडणे)अमृतराव पवार(धुळे)या प्रगतीशील व आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमगुळ येथील मे वर्धमान फर्टीलायझर चे संचालक दिलीप खिवसरा यांचे विशेष सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमारअहिरे
,सुत्रसंचालन धुळे शहराध्यक्ष
प्रा एच ए पाटील सर,तर आभार प्रदर्शन धुळे शहराचे सचिव राजेंद्र खैरनार यांनी केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग मित्र समिती चे जिल्हा संपर्क प्रमुख शाहीर विजय वाघ सर,बोरीस गावाचे शाखाध्यक्ष प्रा विजय बेहेरे,निसर्ग दादा अहिरे,आदींनी विशेष परिश्रम घेतले,शेवटी सर्व सन्माननीय आदर्श शेतकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,पुढील वर्षी या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button