Aurangabad

बिडीएसच्या विध्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बिडीएसच्या विध्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आज मंगळवार रोजी सातारा परिसरातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये ‘माझ्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. ‘आई बाबा बाय बाय’ असे लिहिलेले आहे.
सागर महेंद्र कुलकर्णी (रा.ज्योती प्राइड, सातारा परीसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हा लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बी.डी. एस शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनपासून शहरात आला होता.
त्याचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सागराला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार होता. त्याच्यावर बराळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, मंगळवारी त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button