AmalnerMaharashtra

? कोरोना स्पेशल…. कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जी पणा….बाजार समितीच्या आवारात तुफान गर्दी…शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही….

? कोरोना स्पेशल……

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि कर्मचाऱ्यांचा हलगर्जी पणा….बाजार समितीच्या आवारात तुफान गर्दी….शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही….

तक्रारी नंतर मा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आणि मा पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी तात्काळ केला पाठपुरावा….

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज सकाळ पासून लिलाव प्रक्रिया सुरू असून पारोळा, चोपडा,फैजपूर,धरणगाव इ ठिकाणा हुन शेतकरी माल घेऊन आले आहेत. प्रत्यक्ष भेट दिली असता याठिकाणी गर्दी चा उच्चांक गाठला असून कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नाही. संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे लेखी आदेश नसल्याचे स्पष्ट केले. परंतु जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार दहा पेक्षा अधिक लोक एकत्रित एका ठिकाणी थांबू नयेत.परंतु शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बाजार समितीत आज प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती.

शेतकरी बिचारे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना आपल्या धान्याचा जीव तोडून लिलाव करत होते. कोणत्याही शेतकऱ्याला मास्क पुरविण्यात आला नसून फक्त हमाल,मापाडी,कर्मचारी वर्ग यांनाच मास्क देण्यात आले आहेत.त्याच प्रमाणे हाथ धुणे,पाणी उपलब्ध करून देणे,जन जागृती संदेश सतत फिरविणे,शेतकऱ्यांना समजून सांगणे,आजाराची गंभीरता लक्षात आणून देणे याबाबतीत कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती,कर्मचारी यांनी उपाययोजना राबविलेली दिसून आली नाही.

?? बाईट चेतन रवींद्र पाटील रा भिलाली ता पारोळा

मी स्वतः भेट दिल्यानंतर मा पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी आपले सहकारी शरद पाटील यांच्या सोबत स्वतः यांनी या ठिकाणी भेट देऊन स्वतः जनजागृती पर संदेश पोहचविला.आणि शेतकऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून एका ठिकाणी 10 पेक्षा अधिक लोक थांबणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मा तहसिलदार मिलिंद वाघ यांनी देखील भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला आणि काल म्हणचे 20 मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र दिले असल्याचे सांगितले. तसेच तहसील विभागाचे जन जागृती करणारे वाहन देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाठविले.

एकूणच काय तर शेतकऱ्यांचा कोणी वाली नसून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी किंवा त्यांना हे विषय समजून सांगावे याची काडीमात्र चिंता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूणच विभाग,कार्यलय,राजकीय नेते यांना नाही हे यावरून सिद्ध झाले आहे. आता पर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला कट्टी द्वारे शोषण करून हमीभाव दिला जात नव्हता अचानक आजच शेतकरी,त्यांचा माल,नुकसान इ ची काळजी वाटायला लागली. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संदर्भात जन जागृती होत आहे त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक होते. कारण जगाचा पोशिंदा जगेल तरच जग जगेल तेंव्हा त्याची काळजी घेणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button