Patur

पातुर येथील तीन महिना चे बाळ कोरोना पॉझिटिव्ह

पातुर येथील तीन महिना चे बाळ कोरोना पॉझिटिव्ह

विलास धोंगडे

पातुर:पातुर येथील शिर्ला ग्राम पंचायत हदीतील मुजावरपुरा येथे तीन महिना चे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहे केवळ दोन दिवसापुर्वी कंटेनमेन्ट झोन मुक्त भागाला पुन्हा सील करण्याची प्रक्रिया तहसील दार यांच्या आदेशाने करण्यात आले
पातुर येथील तीन महिना चे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर पातुर चे तहसील दार दिपक बाजड, पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, नायब तहसील दार एहसानोद्दीन शिर्ला ग्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे यांनी सदर परिवाराच्या घरी धाव घेतली आणि परिसर सील करण्यात आले आणि न. प.कडुन फवारणी करण्यात आली.

अकोला येथील नायगाव अकोटफैल मधील बाधीत रुग्णांची मुजावरपुरा भागात सासरवाडी आहे तो रुग्ण आपल्या पत्नी ला घेण्यासाठी आला होता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पातुर शहरातील १३ जणांना अकोला येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या १३ पैकी १२ जणांचे अहवाल गुरूवारी निगेटिव्ह आले तर तीन महिना चे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आला त्या मुळे मुजावरपुरा पातुर, नविन वस्ती हा भाग सील करण्यात आला या परिसराचे आरोग्य सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी विजय रामसिंग जाधव यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button