रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
– कुणबी समाज संघटनेचे आयोजन
चिमूर -ज्ञानेश्वर जुमनाके
कोवीड -१९ कोरोणा विषाणुच्या संसर्गाने आलेल्या महामारी मध्ये संभाव्य रक्ताचा तुटवटा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती . याकरीता आपले राष्ट्रिय दायीत्व लक्षात घेऊन चिमूर येथील कुणबी समाज संघटणेच्या वतीने शासकीय रक्तपेढी ,चंद्रपूर च्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .श्री गुरुदेव सांस्कृतीक भवण वडाळा ( पैकु ) चिमूर येथे सकाळी १० ते ४ च्या दरम्यान झालेल्या या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी स्वंयस्फुर्तीने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
देशात व राज्यात कोरोणा विषाणुच्या संसर्गाच्या रुग्णात व त्यामूळे होणाऱ्या मृत्युतही दिवसागणीक वाढ होत आहे.अशा रूग्णाकरीता रक्ताची आवश्यकता असते.त्यांना रक्ताची कमतरता पडू नये यासाठी चिमूर कुणबी समाज संघटनाच्या वतीने २४ एफ्रील शुक्रवारला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीराचे उट्घाटन तहसीलदार संजय नागटिळक यांचे हस्ते जगतगुरू तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पन व पुजनाने करण्यात आली .या प्रसंगी भिसी अप्पर तालुका तहसीलदार परीक्षीत पाटील ,चिमूर नगर परीषद मुख्याधीकारी मंगेश खवले इत्यादी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते .कुणबी समाजाच्या वतीने आयोजीत या शिबिरा विषयी अधिकाऱ्यांनी आयोजकांचे अनीनंदन केले .
शासकीय रक्तपेढीत उपलब्ध रक्तसंचय साहीत्या नुसार ३३ रक्त दात्यांचे रक्त घेण्यात आले .याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय समाजसेवा अधिक्षक पंकज पवार ,सहायक रक्त पेढी तंत्रज्ञ संदीप बडगे ,अमोल जेद्देवार,अधिपरीचारक अंकीत ढोणे , परीचर लक्ष्मन नगराडे ,रूपक कांबळे व वाहन चालक रूपेश भुमे यांनी कर्तव्य केले .शिबीरा दरम्यान आयोजका कडून आरोग्य विभागाचे स्वच्छते विषयीचे निर्देशा नुसार हातस्वच्छतेकरीता सॅनीटायजर ,रक्तदात्यास मॉस्क व सामाजीक दुरीता पाडण्यात आली .शिबीर यशस्वि करण्या करीता ,किर्ती रोकडे, गणपती ठाकरे, रमेश करारे, गजानन शिंदे, विनोद ढाकुणकर, बकाराम मालोदे , एकनाथ थुटे ,विनोद भोयर, बालाजी ढाकुणकर, पवन कारेकार् श्रीकांत चाफले, प्रमोद शास्त्रनकर, पवन ठाकरे, बंटी शिंदे, विलास वडस्कर, योगेश सोनटक्के, प्रशांत लढी, निलकंठ धोटे, विनोद अढाल, संजय सेडामे, रोहीत उरकुडे, संजय दुधनकर, भालचंद्र सोनटक्के यांनी प्रयत्न केले .






