Chimur

संविधानाच्या कर्तव्याचे पालन करणे हीच खरी राष्ट्रनिष्ठा : समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

संविधानाच्या कर्तव्याचे पालन करणे हीच खरी राष्ट्रनिष्ठा : समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

Chimur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह चिमूर तालुक्यात समतादूत मार्फत राबविण्यात येत आहे. यावेळी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन व संविधानाबद्दल मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी महिला बालकल्याण चिमूर व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागृती या कार्यक्रमात संविधानातील कर्तव्याचे पालन यावर मार्गदर्शन करताना म्हणल्या की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे मानवाच्या केंद्र स्थानी आहे व तो सर्व मानवाच्या मुक्तीचा पवित्र ग्रंथ आहे. तेव्हा या ग्रंथाचे वाचन हे आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी करावे व आपले कर्तव्ये काय आहेत याचे पालन करावे, ही खरी राष्ट्रनिष्ठा आहे असे प्रतिपादन समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंगणवाडी सेविका माधुरी वीर ह्या होत्या. समतादूत प्रज्ञा राजूरवाडे पुढे मार्गदर्शनात म्हणल्या की, भारताची एकात्मता व एकता कायम राहण्यासाठी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, भारतीय संस्कृती, आपले आदर्श, राष्ट्रीय सेवा, भेदाभेद न पाळणे, स्त्रीयांचा सन्मान करणे, एकात्मता, बंधुभाव, विज्ञानवाद, सुधारनावाद, पर्यावरणाचे संरक्षण, हिंसाचाराचा त्याग इत्यादी दहा मूलभूत कर्तव्य चे पालन करून आपल्या राजघटनेचा आदर हा प्रत्येकांनी करावा.

कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. उपस्थितांचे आभार जयश्री कामडी यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button