Dhule

भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात नागरिकांनी उठविला आवाज 

भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात नागरिकांनी उठविला आवाज

आज बोराडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अनागोंधी कारभारामुळे गरीब लोकांना जो नाहक त्रास दिला जातो त्याबद्दल १५ दिवसाचे अल्टीमेटम देऊन निवेदन देण्यात आले.

धुळे राहुल साळुंके

बोराडी येथील भारतीय स्टेट बँक येथील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अनागोंधी व मनमानी कारभारामुळे गरीब, आदिवासी, वयोवृद्ध ह्यांना दिवसभर जो त्रास होतो त्याबद्दल बोराडी परिसरातील व तालुक्यातील राजकीय, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व अनेक पदाधिकारी उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनाण्यात आले तसेच पंधरा दिवसात सुधारणा करण्याचे अल्टीमेटम देण्यात आले सुधारणा न झाल्यास सोळाव्या दिवशी बँकसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदनात आपल्या समस्या व गरजा घेऊन दिवसभर बँकसमोर भरउन्हात उभे राहून बँकेत गेले असता एका मिनिटात ते काम अमान्य होण्याच्या व भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी लिहून देण्यात आले. तसेच बँकेच्या अनेक सुविधांपासून लोकांना दूर ठेवले जाते.

ह्या सर्व तक्रारींवरून सर्व समाजबांधवांनी एक तक्रार निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला. ह्यावेळी प.स.सभापती श्री.सत्तरसिंग पावरा, सामाजिक कार्यकर्ते श्री. जयवंत पाडवी, श्री.रमणभाऊसाहेब पावरा, जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, कांतीलाल पावरा, कोडीद पोलीस पाटील भरत पावरा, खैरनार संजय पावरा सर, राकेश पावरा, कैलाश पावरा, किस्मत पावरा, बिकेडी धुळे महासचिव वसंत पावरा, सुरेश पावरा, भरत पावरा, अशोक कढरे, मनोहर पावरा, टायगर पावरा, नारसिंग पावरा, राजेंद्र पावरा, रवींद्र पावरा, विशाल पावरा, तुषार पावरा, पवन पावरा, बादल पावरा, सचिन पावरा, राहुल पावरा व अनेक सामाजिक व राजकीय व्यक्तींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button