Amalner

आमदारांच्या आवाहनानुसार जास्तीतजास्त युवकांनी ग्रामपंचायत बिनविरोध साठी प्रयत्न करा

आमदारांच्या आवाहनानुसार जास्तीतजास्त युवकांनी ग्रामपंचायत बिनविरोध साठी प्रयत्न करा

गावात विकास व शांततेची नांदी आणा,राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेसचे आवाहन

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर- तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त विद्यार्थी व युवकांनी आपले भुमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटिल यांनी बिनविरोध ग्रामपंचायती साठी जाहीर केलेला 25 लाख रुपये निधी मिळविण्यासाठी एकसंघ होऊन आपापल्या गावात थोरामोठ्यांकडे तसा आग्रह धरून प्रयत्न सुरू करावा असे आवाहन अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धी स दिलेल्या पत्रकात दोन्ही संघटनांनी म्हटले आहे की आ अनिल पाटील यांनी अतिषय चांगल्या हेतून बिनविरोध ग्रामपंचायत करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपये निधीचे प्रोत्साहन दिले असून यामुळे गावागावात आपापसातील वाद व भांडण तंटे मिटून उलट विकासाला चालनाच मिळणार आहे,मात्र गावातील थोर मोठी मंडळी प्रतिष्ठेपायी निवडणूक लढविण्याच्या विचारात असेल तर गावातील युवकांनी आपापल्या गावच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.कुठे युवकांमध्येही गट तट असल्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निमित्त साधून गट तट विसरुन त्यांनीही एकत्र यावे ही अपेक्षा आहे.आपल्या राज्याच्या विकासासाठी 80 वर्षाचे तरुण योध्दा खा शरद पवार साहेब देशाच्या राजकारणा मोठी भुमिका बजावतात हे उदाहरण युवकांना नक्किच प्रेरणा देणार आहे.यासाठी तालुक्यातील युवकांना राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी कॉंग्रेस च्या वतीने विनंती आहे की आपल्याला गावात विकासाची आणि शांततेची नांदी आणण्यासाठी बिनविरोध साठी आग्रह धरावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्याय भूषण संजय भदाणे,शहराध्यक्ष निलेश देशमुख,तालुकाध्यक्ष विनोद सोनवने, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुनिल शिंपी
यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button