Amalner

?️ तालुक्यात अडकलेल्या नी संकेतस्थळा वर अर्ज करा…जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार तहसीलदार मिलिंद वाघ यांचे आवाहन

अमळनेर तालुक्यात लॉक डाऊन मुळे अडकलेल्यांनी आपल्या जिल्ह्यात अथवा राज्यात जाण्यासाठी संकेतस्थळावर अर्ज करा

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार तहसीलदार मिलिंद वाघ यांचे अमळनेर करांना आवाहन

१. अमळनेर तालुक्यातील सर्व जनतेस कळविणेत येते की, मा जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील दि.०१/०५/२०२० चे आदेशान्वये जळगाव जिल्यात आडकलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरु पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांनी त्यांचे इच्छित स्थळी जाण्याची परवानगी मिळण्याकरीता त्यांनी
www.algaon.gov.in या संकेतस्थळावर जाऊन covid१९ या टॅबवर जाऊन दिलेल्या सुचनाप्रमाणे आवश्यक ती माहिती विहीत नमुन्यात अचुकरीत्या भरावी.

२. जळगाव जिल्हयातील रहिवासी असलेले परंतु इतर जिल्हयात, राज्यात अडकलेले स्थलांतरीत
कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांनी त्यांची आवश्यक माहिती
[email protected] या ईमेल वर सादर करावी.

३. तसेच जिल्हयात जाहिर करण्यात आलेल्या Containment Zone मधील कोणत्याही नागरीक /
व्यक्ती यांना जळगाव जिल्हयातून बाहेर जाण्यास तसेच कोणत्याही नागरीक व्यक्ती यांना सदरील
Containment Zone मध्ये येण्याची परवानगी असणार नाही.

४. तसेच इतर राज्यात व जिल्हयात जाहिर करण्यात आलेल्या Containment Zone मधील नागर क
व्यक्ती यांना जळगाव जिल्हयात प्रवेश असणार नाही.

५. जळगाव जिल्हयातुन बाहेर जाण्याकरीता व जळगाव जिल्हयामध्ये येण्याकरिता अर्ज करणाऱ्या प्रत्येक
व्यक्ती/ नागरीक यांना त्यांच्या अर्जासोबतच नोदणीकृत वैद्यकीय व्यावसायीक (नोदणीकृत डॉक्टर्स)यांनी अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे Influenza आजारा सारखी लक्षणे आढळून येत नसल्याबाबत प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

६. तरी याद्वारे सर्व जनतेस आवाहन करणेत येते की, ज्या नागरीकांना अमळनेर तालुक्यातून अन्य
जिल्हयात अथवा राज्यात जावयाचे आहे अशानी www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर
जाऊन आपला सविस्तर माहिती भरावा.
तसेच ज्या नागरीकांना अन्य जिल्हयातून अथवा राज्यातून अमळनेर तालुक्यात यावयाचे आहे अशांनी [email protected] या ईमेलवर माहिता सादर करावी, असे आवाहन करणेत येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button