?आणि अमळनेर च्या रस्त्यावर उसळला 30 फुटाचा कारंजा..अधिकारी उतरले पाण्यात दुरुस्त केली फुटलेली जलवाहिनी….
अमळनेर शहरात आज नाविन्यपूर्ण नजरा पाहवयास मिळाला.आज अमळनेर च्या पैलाड भागात महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुख्य पाण्याची पाईप लाईन फुटली आणि हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली. या संदर्भात मिळालेली माहिती अशी कीं जेसीबी चालकाला योग्य प्रशिक्षण न दिल्याने जलवाहिनी फुटली आणि पैलाड भागात पाणीच पाणी झाले. यावर उपाय योजना म्हणून स्वतः अधिकारी पाण्यात उतरून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करतांना दुर्मिळ चित्र पाहवयास मिळाले.
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड स्वतः पाण्यात उतरले आणि अधिकारी पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशीरा ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात यश मिळाले. यामुळे येत्या काही दिवसातील पाणी पुरवठा संकट टळले आहे.
पैलाड भागात नागरिकांनी उंचच उंच नायजेरियन धबधब्याचे दर्शन घेतले. अति दाबाचा 25 ते 30 फूट उंचीवरून पाण्याचा हा प्रवाह वेगात सुरू असताना लोकांच्या जीवित हानी चा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांनी आपला जीव वाचवत सुरक्षित स्थळ गाठले.
अमळनेर शहरात विविध प्रकारचे रस्ते,गटारी इ कार्य सुरू आहे. अनेक ठिकाणी ठेकेदारांच्या बेजबाबदार पणाचा विनाकारण भुर दंड नागरिकांना भरावा लागतो आहे.अनेक ठिकाणी पाण्याचे कनेक्शन तोडून टाकल्या मुळे नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही अश्या अनेक घटना घडल्या आहेत.
ठेकेदाराने जबाबदार पणे कार्य करणे अपेक्षित असून अश्या ठेकेदारांवर योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे.काम तांत्रिक दृष्ट्या करणे आवश्यक आहे.परंतु यात हलगर्जीपणा होत असल्याने आज एका मोठ्या संकटातून शहरवासीय वाचले आहेत. अमळनेर शहराचा पाणी पुरवठा जरी थांबला असला तरी जीवित हानी मात्र टळली आहे.






