Amalner

झेप फाँउनडेशन अमळनेर संचलित “महिला आठवडा बाजार” दर रविवारी

झेप फाँउनडेशन अमळनेर संचलित “महिला आठवडा बाजार” दर रविवारी

झेप फाँउनडेशन अमळनेर संचलित “महिला आठवडा बाजार” दर रविवारी भरविला जातो अवश्य भेट द्या ठिकाण :-“इंदुमाई “मा. आमदार कार्यालय, स्टेशन रोड अमळनेर
हळदी कुंकू आणि प्लास्टिकचा छोट्या छोट्या स्टिलच्या वस्तूचा कचरा घरात साचून साचून नको होईल .संक्रांतीचा सण आला की बायकांची लगबग सुरू होईल ,हळदी कुंकू, वाण…

पूर्वी सवाष्ण स्त्रीची ओटी भरून वाण द्यायची पद्धत होती जी की सर्वस्वी इको फ्रेंडली होती ..

आता हेच पहा ..मार्केट मध्ये चिनी बनावटीच्या स्वस्तात मस्त अश्या वस्तूंना उधाण येईल आणि हजारोंनी सवाष्णी ,त्या वस्तू खरेदी करतील..देवाण घेवाण होईल ..अश्या वस्तू 70%वस्तू या प्लास्टिक च्या ..त्यामुळे त्या वस्तूंचा उपयोग न होता ..फक्त कचरा जमा होईल ..म्हणजेच करोडो टन प्लास्टिक चा कचरा हळदी कुंकू च्या नावाखाली पर्यावरणात येईल …ज्याचा ह्रास ,विघटन वर्षानुवर्षे होणार नाही..म्हणून…

सर्वच स्त्रियांना कळकळीची विनंती आहे ..आपण पर्यावरण पूरक हळदी कुंकू करूयात ..आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ..सुख समृध्दी च वाण देऊया..त्यासाठी खूपच सुज्ञ खरेदी करावी लागेल किंवा मसाले , घरगुती वापराचे साहित्य उदा. आवळा candy, बडीशोप मुखवास, जवस मुखवास, मसाला सुपारी, लोणचे, चहा मसाला , विविध प्रकारचे साबण, आलेपाक, ऊटणे ई. वस्तू वाण म्हणून खरेदी करा. ज्यांचा आपल्याला उपयोग पण होतो.
चिनी स्वस्त वस्तूंच्या लोभात न पडता आणि भपंक पणाच्या विळख्यात न अडकता साध्या वस्तूंचा स्वीकार करावा लागेल ..इतकं मन आपण मोठं ठेऊच शकतो..जेणेकरून आपण किमान दोन लाख स्त्रियांनी जरी हा संकल्प घेतला तरी
बराच फरक पडू शकतो ..म्हणतात ना
*थेंबे थेंबे तळे साचे..*, तसे
“थेंबे थेंब तळे वाचे”

चला या वर्षी नवीन काही तरी करून आपल्या पुढच्या पिढीसाठी आदर्श ठेऊयात.वरील सर्व प्रकारच्या वस्तू महिलांनी स्वता तयार केलेल्या आपणास महिला आठवडा बाजारात उपलब्ध आहेत खरेदी करा, आणि आगळा वेगळा हळदी कुंकवाच्या सण साजरा करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button