Nashik

जगभरातील करोडो लोकांचे उद्धार करते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येवला तालुका व परीसरात विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरी

जगभरातील करोडो लोकांचे उद्धार करते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येवला तालुका व परीसरात विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरी

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक=महामानव,विश्वरत्न नाशिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती रिपाई प्रणित भिमतेज मिञ मंडळ यांच्या वतीने एकत्रित साजरी करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना आंबेडकर राईट पॅथर आॅफ इंडिया उतर महाराष्ट्र पक्षाचे संपर्कप्रमुख निभिॅड पञकार शांतारामभाऊ दुनबळे यांनी सांगितले की जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले असे युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करून आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र होण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटना लिहून ती या देशाला अर्पित केली व जातीपातीत विखुरलेल्या अनिष्ट रूढी परंपरेत अडकलेल्या भारत देशाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. प्रत्येक माणसाला सन्मानाने व अभिमानाने त्याचे जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा या संघर्षमय महामानवाला सर्व भारतीयांकडून जयंतीच्या दिवशी विनम्र मानवंदना.
यावेळी जयंती उत्सवासाठी लोकमत पञकार संजय दुनबळे , सामाजिक कार्यकतॅे सुनिल दुनबळे सचन दुनबळे पप्पु धीवर सिध्देश दुनबळे विलास दुनबळे राजेन्द्र दुनबळे प्रसाद दुनबळे सह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष जंयती उत्सव समिती अध्यक्ष अशोक दुनबळे तर सुञसंचालन मास्तर रांजेन्द्र दुनबळे यांनीकेले भिमतेज मंडळावतीने गामस्थांना भोजनदान देण्यात आले तर सांयकाळी इंडीयन आयडेल फेम येवल्याची गानकोकीळा अनिल पगारे प्रस्तुत स्वर साधना आ्म्रपाली पगारे याचा भिमगीताचा मनोरंजन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमा यशस्वी करण्साठी समिती पदाधिकारी विशेष परीश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button