Khirdi

खिर्डी खु विवरा रोड वरील स्मशान भूमी येथे आमदार निधि अंतर्गत हाय मास्ट लाईट बसविण्याची बौद्ध समाज बांधवांची मागणी

खिर्डी खु विवरा रोड वरील स्मशान भूमी येथे आमदार निधि अंतर्गत हाय मास्ट लाईट बसविण्याची बौद्ध समाज बांधवांची मागणी

३०ऑगस्ट रविवार रोजी खिर्डी खु. येथील रहिवासी सूपडू अशोक कोचुरे यांचे दीर्घ आजाराने रात्री १वाजता मृत्यू झाल्याने रात्री अहो रात्री काही कारणास्तव ताबडतोब प्रेत रात्रीच न्यावे लागले. गावा पासून सुमारे१ किमी दूर स्मशान भूमी असल्याने रस्त्याने स्ट्रीट लाईट ची साधी व्यवस्था पण केलेली दिसत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रोड वर विषारी सापाचा वावर असल्याने नागरिक घाबरतात कारण अंधारात काहीच दिसत नाही .तरी मा.आमदार श्री.चंद्रकांत पाटील यांचे कडे बौद्ध समाज बांधवांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. राजू मांगो कोचुरे .लक्ष्मण तुकाराम कोचुरे राजेंद्र बालू तायडे दीपक चांगदेव कोचुरे इ नागरिकांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button