अमळनेर तालुक्यातील आणखी चार रुग्ण बाधित… तालुक्यातील अद्याप ५७ अहवाल प्रतीक्षेत…
रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यात आज आणखी चार बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकूण ४६ लोकांचे स्वॅब घेण्यात आले.
सदर रुग्ण शहरातील शिव कॉलनी भागातील ८२ वर्षीय पुरुष व २९ वर्षीय महिला, शिरुड येथील एक ६६ वर्षीय पुरुष, ९२ वर्षीय पुरुष सप्तशृंगी कॉलनी असे रुग्ण असल्याचे समजते. आतापर्यंत ५७ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.






