जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार…
धुळे प्रदीप शिरसाठ
जागतिक महिला दिनानिमित्त शिरपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हाताची घड्याळ व पुष्पगुच्छ देऊन धुळे जिल्ह्याच्या निरीक्षक मिनलताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. योगिताताई शेखर पाटील, क्रीडा क्षेत्रातून कु. मेधा हेमंत गुरव, पोलिस विभागातून अलकताई बोरसे, सैनिक कुटुंबातील विद्याताई वारुळे व कोकीला गुरव या गणितात पारंगत असलेल्या 69 वर्षीय आजी ज्या आज आपल्या नातवंडांना घरीच गणित शिकवतात. त्यांच्याही सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या…कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे जिल्ह्याध्यक्षा ज्योती पावरायांनी केले.






