Maharashtra

परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे अमेरिकेत भरगच्च कार्यक्रम फोटो- शिकागो येथे स्वागत करतांना

परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे अमेरिकेत भरगच्च कार्यक्रम
फोटो- शिकागो येथे स्वागत करतांना भाविक

परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे अमेरिकेत भरगच्च कार्यक्रम फोटो- शिकागो येथे स्वागत करतांना

 फैजपूर:प्रतिनिधी सलीम पिंजारी
      येथील सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा दि. १९ जुलै ते १२ ऑगस्ट २०१९ असा अमेरिका दौरा असून नुकतेच त्यांचे अमेरिकेतील शिकागो येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.  ते दि. १९ ते २३ जुलै शिकागो, दि. २४ ते २८ जुलै फ्लोरिडा, दि. २९ जुलै ते ४ ऑगस्ट पेन्सिल्व्हानिया, दि.५ ऑगस्ट न्यूजर्सी, दि. ६ ते आठ ऑगस्ट कनेकटीक्युट व दि. ९ ते १२ ऑगस्ट न्यूयॉर्क या अमेरिकेतील प्रमुख शहरांत मध्ये ‘चलो सर के पंथ…’ हा नारा घेऊन अध्यात्मिक कार्यक्रम घेणार आहेत.  गेल्या चार महिन्या आधीच या संपूर्ण कार्यक्रमाचे योजनाबद्ध नियोजन करून या धार्मिक सोहळ्याचे अमेरिकेतील  मूळ भारतीय रहिवाशांनी आयोजन केले आहे. या अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमास अमेरिकेतील प्रमुख शहरातील त्या त्या परिसरातील सर्व भारतीय बांधवांसह अमेरिकन नागरिक मोठ्या संख्येने भाग घेऊन आनंद लुटतात.  महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराजांनी आधीही सनातन सतपंथ धर्म प्रचार व प्रसारासाठी लंडन, कॅनडा व अमेरिका या देशात जाऊन भारताचे नावलौकिक केली आहे. त्या ठिकाणी महाराजांचा असंख्य भक्तगण असून पुढील वर्षासाठीचे नियोजन करून तारीख व वेळ निश्चित करून घेत असतात ही अभिमानाची बाब आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button