Amalner

अमळनेर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे अंमलदार शरद पाटील यांना पीएच. डी.पदवी प्राप्त

अमळनेर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे अंमलदार शरद पाटील यांना पीएच. डी.पदवी प्राप्त

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर – येथील पोलीस स्टेशनला गोपनीय शाखेत अंमलदार पदावर कार्यरत असलेले शरद पाटील यांना आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने राज्यशास्त्र विषयात पीएच. डी.पदवी प्राप्त झाली आहे.
शरद पाटील हे पोलीस दलात कार्यरत आहेत. अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रात असूनही केवळ शिक्षणाची ओढ असल्याने त्यांनी विविध विषयातील पदव्या प्राप्त केल्या आहेत. दहावी नंतर टर्नर व इलेक्ट्रीशियन या दोन विषयात आयटीआय मधून पदवी घेतली. सीएनसी ऑपरेटींग पदविका,कृषी पदविका, टायपिंग, एमएससी आयटी, राज्यशास्त्र विषयात पदवी, कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग पदवी, बी.एड.,एम.ए. आणि आता पीएच. डी.अशी मोठीच शैक्षणिक वाटचाल शरद पाटील यांची आहे.

आम आदमी पार्टीची राजकीय वाटचाल हा त्यांच्या संशोधनाचा विषय असून येथील प्रताप महाविद्यालयातील प्रा.डॉ.विजय तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आहे. आज त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांच्या हस्ते पीएच. डी.देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्रा. डॉ.विजय तुंटे,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे,अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांचीही उपस्थिती होती. शरद पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे त्यांचे मनापासून अभिनंदन…!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button