उपमुख्याधिकारी यांच्या वरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर न.पा. कर्मचारी यांनी दिले निवेदन .
काळ्या फिती लावून केले काम
अमळनेर नपा चे उपमुख्याधिकारी श्री संदिप गायकवाड यांचेवर दि 2/11/19रोजी रात्री 11-30 वाजता ते नाशिक येथील त्यांच्या घरी जानेसाठी गाडीची वाट बघत असताना लुटीच्या उद्देशाने चाकू हल्ला करून गंभीरपणे जखमी केलेले आह. सद्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून या प्रकारचा अमळनेर नपा कर्मचारी संघटना नी आज दि 4/11/19रोजी या हल्ल्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवले असून हल्लेखोरांवर कडक कारवाई संदर्भात मा. जिल्हाधिकारी साहेब,मा प्रांत मॅडम,मा पोलिस उपअधीक्षक साहेब, मा पोलीस निरीक्षक साहेब,व मुख्याधिकारी मॅडम याना निवेदन दिले असून सदर निवेदनावर
राष्ट्रीय नपा मजदूर महासंघाचे जनरल सेक्रेटरी रामभाऊ संदानशिव, भारतीय कर्मचारी महासंघाचे जनरल सेक्रेटरी सोमचंद संदानशिव,यांच्या निवेदनावर सह्या असून निवेदन देते वेळी श्री संजय चौधरी, युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे,राधा नेतले, प्रशांत ठाकूर,शेखर देशमुख, साजिद पठाण,इकबाल पठाण,jv महाजन, बापू शिंगाने, नितीन खैरनार, फारूक ,गणेश पाटील,भास्कर मगरे,सतीश बडगुजर मदन पाटील,प्रवीण शेलकर,विजय पाटील,मधुसूदन पाटील,सुधाकर महाजन,अरुणा बहारे, ईश्वर पाटील,संजय सोनवणेव इतर कर्मचारी वर्ग हजर होते.






