Akkalkot

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान ट्रस्ट अक्कलकोट येथील मंदिरात कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजनेची सुरुवात प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने अंमलबजावणीची सुरुवात

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान ट्रस्ट अक्कलकोट येथील मंदिरात कोरोना व्हायरस प्रतिबंधक उपाययोजनेची सुरुवात

प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने अंमलबजावणीची सुरुवात

कृष्णा यादव, अक्कलकोट प्रतिनिधी अक्कलकोट :-

कोरोना व्हायरसने घातलेल्या जगभरातील थैमानामुळे त्याचे संसर्गित रुग्ण भारतात ही आढळून येत आहेत. या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी देशभर घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर देशविदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता येत असतात. दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे-मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे कोरोना या आजाराचा संसर्ग प्रसारित होऊ नये या करिता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी ज्योती पाटील, अक्कलकोटचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाठ, मुख्याधिकारी आशा राऊत या प्रशासकीय टीमने दिलेल्या निर्देशानुसार श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट या न्यासाकडून खबरदारी घेत या धार्मिक संस्थेचे विद्यमान चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीचे महाविद्यालयाचे प्रा.नागनाथ जेऊरे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमख, वैद्यकीय अधिकारी अशोक राठोड, डॉ. बिराजदार, मुजावर तलाठी, नाईकवाडी, यांच्या उपस्तिथीत आज दुपारच्या नैवेद्य आरतीनंतर भाविकांना सॅनिटायजर व मास्कचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक भाविकांना सॅनिटायजर वितरित करून करण्यात आले. या कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेची सुरुवात समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी कोरोना गो च्या धर्तीवर वटवृक्ष मंदिर व परिसरातील साफसफाई करणाऱ्या सेवेकऱ्याना साफसफाई जागृततेबद्दल सूचित करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर व इतरवेळी सर्व भाविकांनी आपले तोंड व नाकावर रुमाल अथवा मास्कचा वापर करून मंदिर समितीस सहकार्य करावे, सर्वानी आपल्या स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी याबाबत विविध माध्यमांद्वारे जाहीर प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. ही अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याकामी विविध विभागांना सूचना दिलेल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button