Pandharpur

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी सौ. गायकवाड तर ता. उपाध्यक्ष पदी सौ.खरे राष्ट्रवादी ओबीसी च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी सौ. गायकवाड तर ता. उपाध्यक्ष पदी सौ.खरे
राष्ट्रवादी ओबीसी च्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार


रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने नुकतीच जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सौ. अविंदाताई हनुमंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी रोपळे येथील सौ. मायाताई महादेव खरे यांची निवड करण्यात आली तसेच सरचिटणीसपदी सौ मनीषाताई बुद्धम् सोनवणे यांची निवड करण्यात आली असून सर्वांना त्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना नूतन महिला तालुकाध्यक्षा सौ अविंदाताई गायकवाड म्हणाले की आपल्याला समाजकार्याची आवड आहे.मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्षहिता बरोबरच पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहू तसेच राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू यापूर्वी त्यांनी तालुक्यातील जनसेवा संघटना तसेच दलित महासंघ या संघटनेत तालुकाध्यक्ष पदावरुन काम केले आहे त्याचबरोबर रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवल्याने त्याची दखल घेत राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ. साधनाताई राऊत यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण पक्षाच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करणार असून जास्तीत जास्त महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू व तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी ओबीसी महिला शाखांची स्थापना करू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पंढरपूर तालुका उपाध्यक्षा सौ.मायाताई महादेव खरे म्हणाले की राष्ट्रवादी पक्षाने आपल्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्याला तडा न जाऊ देता पक्षवाढीसाठी प्रयत्न करू तसेच महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून कार्य करण्याचे आश्वासन दिले.
सौ. सुप्रियाताई सुळे
खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,सौ.रूपालीताई चाकणकर महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ.जयमालाताई गायकवाड महिला प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ.सुवर्णाताई बागल
प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ.दिपालीताई पांढरे
निरीक्षक सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ.भारतीताई शेवाळे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सौ.जयमालाताई गायकवाड(राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महिला जिल्हा उपाध्यक्ष)व सौ.साधनाताई राउत(राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ओबीसी)
सौ.अनिताताई नागणे
महिला जिल्हा अध्यक्ष सोलापूर यांचे प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले असून नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे तसेच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ दादा भालके यांच्या हस्ते पदनियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष शफी इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, गणेश पाटील, श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष सुधीर भोसले, सुभाष भोसले, सह पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button