?️अमळनेर कट्टा…खळबळजनक…अमळनेर जवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह..! अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल..!
अमळनेर शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर टाकरखेडा रोड जवळील वन विभागाच्या हद्दीतील परिसरात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह अनोळखी असून मृतदेह जळाला असल्याने ओळख पटविणे अशक्य झाले आहे. वन विभागाचे कर्मचारी गणेश आत्माराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता कलम 302, 201 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वन विभागाचे कर्मचारी गणेश पाटील हे सकाळी 10 वाजता पाणी देण्यासाठी तेंव्हा त्याच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी अमळनेर पो स्टे ला जाऊन फिर्याद दिली आहे. पो नी जयपाल हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली व चौकशी सुरू आहे.तपास पो नी जयपाल हिरे हे करत आहेत.
मयत अनोळखी पुरुष असून वय अंदाजे 30 वर्षे अर्थवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे.






