?️ अमळनेर कट्टा…ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर..28 जाने 2021 रोजी सोडत
अमळनेर तालुक्यातील एकुण 119 ग्रामपंचायती मधुन सन 2020-2025
या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत खालील प्रमाणे दिनांक 28/01/2021 रोजी छत्रपती शिवाजी
महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे सकाळी 11.00 होणार आहे.अशी माहिती तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षण तपशील
आरक्षित सरपंच पदे जमातीसाठी प्रवर्गासाठी आरक्षित असलेली सरपंच पदे
संख्या आरक्षित सरपंच पदे सरपंच पदे
अनु.अनुजाती..06
अनु जाती महिला 03
अनु जमाती 14
अनु जमाती महिला 07
ना मा प्र 32
ना मा प्र महिला 16
खुल्या प्रवर्गासाठी 67
खुल्या प्रवर्गासाठी महिला 33
एकूण 119
गट विकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांना कळविणेत येते की, सबंधित
ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना सदर जाहीर सुचना प्रसिध्दीसाठी देऊन प्रसिध्दी अहवाल सादर करावयाचा आहे तर तलाठी सजा (सर्व) ता.अमळनेर यांना देऊन कळविण्यात येते,प्रस्तुतची जाहीर सुचना गावी दवंडीने प्रसिध्द करुन दवंडी रजिस्टरचा उतारा व प्रसिध्दी अहवाल उलटटपाली इकडेस
सादर करावयाचा आहे.अशी माहिती मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.






