Amalner

?️अमळनेर कट्टा….अखेर विपुल गारमेंट ला सील..!प्रशासनाच्या एका जावया वर शेवटी कार्यवाही..!बाकीच्यांच काय..!

?️अमळनेर कट्टा….अखेर विपुल गारमेंट ला सील..!प्रशासनाच्या एका जावया वर शेवटी कार्यवाही..!

अमळनेर येथील विपुल गारमेंट वर अखेर कार्यवाही करण्यात आली आहे. गेल्या संपूर्ण वर्षात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.यामुळे वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले असून अत्यावश्यक सेवाच काही कालावधी पुरता सुरू राहणार आहेत.याअगोदर देखील अनेक दुकानांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. व त्यांची माहिती देखील प्रशासनाला वेळोवेळी देण्यात आली आहे. परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.परंतु आता मात्र थेट जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत सदर दुकान सुरू असल्याचे व्हिडीओ गेल्या मुळे प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये आले असून अनेक दुकानांवर कार्यवाही करण्यात येत आहे.विपुल गारमेंट च्या मालकांनी दर दिवशी 1000रु देतो अशी अफवा पसरवली होती अशी चर्चा सुरू आहे आणि काल त्यांनी ह्या पद्धतीचे स्टेटस देखील ठेवले होते..यावर गावात उलट सुलट चर्चे ला उधाण आले आहे.. प्रशासनाच्या कार्य पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

?️अमळनेर कट्टा....अखेर विपुल गारमेंट ला सील..!प्रशासनाच्या एका जावया वर शेवटी कार्यवाही..!बाकीच्यांच काय..!

आज विपुल गारमेंट सह डीलक्स मॅचिंग सेंटर ला देखील सील करण्यात आले. याशिवाय नरेंद्र शिंपी यांच्या कडून 500 रु दंड वसूल करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button