Amalner

?️अमळनेर कट्टा…पोलखोल…धार रस्त्यावर वृक्षांची कत्तल..!जबाबदार कोण..? सुस्त प्रशासन.. आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं..!

?️अमळनेर कट्टा…पोलखोल..धार रस्त्यावर वृक्षांची कत्तल..!जबाबदार कोण..? सुस्त प्रशासनाचा आणखी एक सावळा गोंधळ…!आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं..!
वृक्षांबाबत आमची उदासिनता…
वृक्षांची होणारी कत्तल ….
ऑक्सीजनची कमतरता …..आणि प्रशासन …. एक प्रश्नचिन्ह
अमळनेर — धार रस्त्याला बल्ल्या मारूती पर्यंत २३/२४ झाडांची कत्तल झाली आहे. ह्या झाडांची कत्तल करताना कोणी परवानगी दिली, कोणी घेतली इ प्रश्न गुलदस्त्यात आहेत.कोरोना काळात ऑक्सीजनची कमतरता व त्यामुळे होणारे मृत्यु
याबाबतच्या बातम्या सर्वांनीच पाहिल्या , काहींना तो कटु अनुभव आला ही असेल.शासनाच्या नियमानुसार माझी वसुंधरा अभियान एका बाजूला सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला बिनधास्तपणे झाडांची कत्तल केली जात आहे. याकडे कोण लक्ष देणार..?कोण कार्यवाही करणार? प्रशासनाला या सर्व बाबी निदर्शनास येत नाहीत का? की जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते.
झाडे जगविणे तर दुरच राहिले , पण अनेक ठिकाणी झाडांची बेसुमार कत्तल सुरुच आहे. हे खरोखरच प्रशासनाच्या लक्षात येत नसेल का? की हे सर्व
संगनमताने चालु आहे ? आंधळ दळतय व कुत्र पीठ खातय.”” अशी काहीशी अवस्था झाली आहे.
भ्रष्टाचाराने सर्व व्यवस्था पोखरून टाकली आहे . जर ही झाडांची कत्तल अवैध , बेकायदेशीर असेल तर ते करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हायलाच हवी.अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.वन विभाग तर सुस्त आणि गायब आहेच तालुक्यातून ..!कोणताही वन अधिकारी संपर्कात राहत नाही. फोन उचलत नाही.महसूल तर काय सुस्तच आहे.. फक्त कामाचा देखावा आहे..!प्रत्यक्षात काम शून्य आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button