?️ अमळनेर कट्टा…नगरसेवकाची गाडी फोडली…कोणीही जखमी नाही..पण जाणून घ्या हल्ल्यामागील कारण..
अमळनेर येथे काल रात्री अंतुर्ली रंजाणे येथे अमळनेर शहरातील नगरसेवक यांची गाडीचे काच फोडल्याची घटना घडली आहे.मागे देखील एकदा ग्राम पंचायत निवडणूक दरम्यान या नगरसेवकावर हल्ला करण्यात आला होता. काल हळदी च्या ठिकाणी स्वतः नगरसेवक उपस्थित नसताना त्यांची गाडीची समोरची काच फोडण्यात आले.सदरची घडलेली घटना पाहता व भविष्यात याचे रूपांतर गंभीर प्रकारात होऊ शकते. कोणा संदर्भात अधिक हानी होण्या आधी सदर विषय तालुक्यातील जेष्ठ लोकांनी हाती घेऊन निस्तारणे आवश्यक आहे.
या संदर्भात घडलेली घटना अशी की दिनांक 12/7/2021 मौजे अंतुर्ली -रंजाणे येथे रात्री हळदीचा कार्यक्रम ऐन रंगात आला असताना अमळनेर येथील नगरसेवक यांचे बंधू व इतर लोक तिथे गेले. पण थोड्याच वेळात अचानक जोरात आवाज आला आणि गाडी फुटण्याचा (काचा फोडण्याचा ) आवाज आला.तात्काळ dj बंद करण्यात आला. कुणाला काय कळण्या अगोदर छापामार पद्धत अवलंबून गाडी फोडणारे पसार झालेत असे समजते.
सकाळ पासूनच सदर विषयाची जोरात चर्चा गावात सुरू होती. राजकीय रंजिश,मतभेद हे त्यास कारणीभूत आहे असा कयास लावला जात आहे.
तरी भविष्यात हा प्रकार आप आपसात मोठा होऊ शकतो. म्हणून ज्या करकर्त्यांच्या जीवावर नेते सत्ता भोगतात त्यांनी हा प्रकार वाढीस नको यायला म्हणून सलोखा करणे महत्वाचे आहे असे मत काहींनी व्यक्त केले.कारण अश्या प्रकारांमुळे भविष्यात कायदा आणि सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन निरापराध नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो.
या संदर्भात नगरसेवक यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी मी लस घेतल्या मुळे घरी होतो.पण भाऊ गेला होता.ज्यांनी कोणी हा विषय केला आहे ते लक्षात आले आहेत. पण योग्य वेळी योग्य उत्तर जरूर त्यांना मिळेल असे सांगितले आहे.
तसेच अंतुर्ली रंजाणे येथील जेष्ठ राजकीय कार्यकर्ते शिवाजी दास भाऊ यांनी सदर घटना योग्य नसून आमचे गाव अत्यन्त शांतता प्रिय आहे.गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने अनेक वर्षांपासून एकत्र राहत आहेत. कधीच कोणताही इशू या या गावाचा झाला नाही. पण ही घटना योग्य नसून गावकरी देखील गोंधळात आहेत.






