?️अमळनेर कट्टा..खान्देश तेली समाज मंडळाची अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर..अध्यक्षपदी भूषण चौधरी उपाध्यक्ष संतोष चौधरी, तर सचीवपदी अरूण चौधरी
अमळनेर येथील खान्देश तेली समाज मंडळाचे अमळनेर तालुक्याचे अध्यक्ष श्री भूषण सुरेश चौधरी यांच्या शिफारशीनुसार खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास आधार चौधरी यांच्या आदेशावरून मंडळाचे सचिव श्री रविंद्र जयराम चौधरी यांनी अमळनेर तालुका कार्यकारणी जाहीर केलेली असून तालुक्याच्या उपाध्यक्षपदी मारवड येथील श्री प्रदीप भिका चौधरी व मुडीबोदर्डे येथील संतोष गुलाबराव चौधरी* यांची निवड करण्यात आलेली आहे. तालुका सचिव पदावर अमळनेर येथील श्री अरुण धोंडू चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. तालुका संघटक म्हणून वैभव पुरुषोत्तम चौधरी अमळगाव, संजय यादव चौधरी कळमसरे, नरेंद्र कडू चौधरी जळोद यांची निवड करण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून अमळगाव येथील परेश रवींद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.नवीन निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीचे खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.खान्देश तेली समाज मंडळाच्या वरिष्ठ कार्यकारणी च्या आदेशान्वये नूतन पदाधिकारी काम करतील अशी ग्वाही तालुका अध्यक्ष श्री भुषण सुरेश चौधरी यांनी दिली.







