पंढरपूर

महर्षी वाल्मिकी संघाचा महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा!

महर्षी वाल्मिकी संघाचा महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा!

रफिक अतार

पंढरपूर- समस्त महादेव कोळी समाजाच्या अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात प्रलंबीत होते, असे अनेक प्रश्न भाजपा शासनाच्या काळात मार्गी लागल्याने आम्ही बहुमताने भाजपास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढे उर्वरीत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्याने आम्ही बहुमताने भाजपाच्या पाठीशी आहोत. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक मोठ्या फरकाने निवडून येतील.

असा विश्वास महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केला. नुकताच त्यांनी महर्षी वाल्मिकी संघाचा पाठींबा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना जाहिर केला.

पाठींबा जाहीर केल्याबद्दाल युटोपियन शूगर्सचे चेअरमन उमेश परिचारक यांनी महर्षी वाल्मिकी संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी राहुल परचंडे, संपत सर्जे, नवनाथ करकमकर, श्रीकांत बळवतराव, अभय अंकुशराव, विकी अंभगराव, वैभव कांबळे, रामभाऊ सुरवसे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button