धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग यांच्या मागणीला मोजक्या तीन दिवसात यश
धुळे : धुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग यांच्या मागणीला मोजक्या तीन दिवसात यश
धुळे शहरातील चाळीसगांव रोड शम्मबर फुटी क्रॉस येथे गेली वर्षा भरापासून अनेकदा अपघात झाले असून सदर ठिकाणी या दोन ते तीन महिन्यात दोन युवकांचा अपघाती निधन झाले होते , दिनांक 15 / 3/ 2021 रोजी चौरसिया नामक युवकाची अपघाती मृत्यू झाला होता त्या अपघात ची दखल घेत धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग यांनी दिनांक 18 /३ / 2021 रोजी धुळे जिल्हा बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता व धुळे महानगरपालिका आयुक्त यांना सदर चाळीसगाव रोड शंभर फुटी रोड क्रॉस येथे तात्काळ गतिरोधक व फलक लावण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देऊन मागणी केली , अन्यथा चार दिवसात शंभर फुटी रोड येथे जन आंदोलन करण्याचा इशारा ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग यानी इशारा दिला होता आज दिनांक 21/3/2021 रोजी मोजके तीन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत धुळे बांधकाम विभाग यांनी तात्काळ काम सुरू केले सदर कामाची पाहणी करतांना धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष जमीर शेख, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सरचिटणीस सलीम शेख लंबू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सचिव अल्पसंख्याक विभाग अझर पठाण यांनी सुरू झालेल्या कामाची पाहणी केली,






