Amalner

अमळनेर वाढत्या गुन्हे गारीमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात..केंव्हाही यावे गोळी मारून जावे,कोणीही यावे चोऱ्या करून जाव्यात ….

अमळनेर वाढत्या गुन्हे गारीमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात..केंव्हाही यावे गोळी मारून जावे,कोणीही यावे चोऱ्या करून जाव्यात ….
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवळ एका व्यापाऱ्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून हातातील बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना 11 वाजून 30 मि रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार केल्यानंतर चोरटे लगेच पसार झाले.

अमळनेर वाढत्या गुन्हे गारीमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात..केंव्हाही यावे गोळी मारून जावे,कोणीही यावे चोऱ्या करून जाव्यात ....

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकरशेठ बितराई यांचे भाऊ बसंतालाल बितराई (कैलास ट्रेडिंगचे मालक) हे त्यांचा मुलगा अजय याच्यासोबत दुकान बंद करून घरी परतले. ते घराजवळ पोहचले असता सेंट्रल बँकेकडून दोन जण मोटारसायकलवर आले. त्यांनी दोघांच्या हातातून खाली थैली व जेवणाचा डबा हिसकावण्याचा प्रयत्न करीत असताना गोळीबार केला. सुदैवाने गोळी दोघांच्या मधून जाऊन भिंतीला लागली आणि रिकामी पुगळी काही फुटांवर जाऊन पडली.
सदर घटनेचे वृत्त कळताच भरत ललवाणी घटनास्थळी पोहचून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयाची तपासणी केली.
चार वर्षांपूर्वीही याच ठिकाणी एका व्यापारयालायाच पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न झाला होता. अश्या घटना वारंवार घडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे त्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत आहे मग पुन्हा तसाच प्रकार घडत आहे याचा अर्थ काय असू शकतो.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरीचे गुन्ह्या चे प्रमाण अधिक वाढले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button