सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ राहुल कुवर यांची निवड..
राहुल साळुंके
धुळे तालुक्यातील मुकटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. राहुल हिम्मतराव कुवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हा. चेअरमनपदी सतीश भाईदास पाटील यांची निवड करण्यात आली.
दि २९ सप्टेंबर रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे तालुका यांचा आदेशानवये मुकटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळातून चेअरमन व व्हा चेअरमन यांची निवड करण्यात साठी प्राधिकृत अधिकारी म्हणून व्ही.जी.भडागे अध्यक्षतेखाली उपनिबंधक सहकारी संस्था धुळे प्रशासकीय कार्यालयात सभा बोलवण्यात आली नियोजित सभेत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा व अभिनंदनाच्या वर्षाव करण्यात आला यावेळी डॉ. राहुल कुवर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विकास सोसायटी ही शेतकऱ्यांनाच्या आर्थिक जीवनाशी संबंधित असणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी केंद्रस्थानी ठेवून अर्थ पुरवठा कसा वेळेत करता येईल व महाराष्ट्र शासन सहकार विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत कश्या पोहचतील यासाठी भविष्यकाळात आम्ही सर्व कार्यकारी मंडळ पर्यन्तशील राहू पीक विमा,बॊड आळी निधी पी एम किसान योजनेचा माध्यमातून मुकटी परिसरातील शेतकऱ्यांना कसा लाभ होईल यासाठी प्रयत्नशील राहू त्याचा या निवडीबद्दल राजकीय,सामाजिक,वैद्यकीय, शैक्षणिक, सर्वच मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.






