बारामतीत कोरोनाचा एका दिवसात शंभरी पार
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – बारामती शहर व तालुक्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.गेल्या 24 तासात 110 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.100पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडल्याची पहिलीच घटना आहे.येथील रुग्णाची संख्या 1011 पर्यन्त पोहचली आहे.प्रशासनाने बारामतीकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.बारामतीमध्ये एकूण घेतलेल्या नमुन्यांमध्ये 148 पैकी 72 जणांचे अहवाल पॉसिटिव्ह आलेले आहे.तसेच 36 जणांचे शासकीय इंटिजेन नमुन्यांपैकी 18जणांचा अहवाल पॉसिटिव्ह आला आहे.खाजगी प्रयोगशाळेत 63 जणांचे नमुने घेऊन त्यापैकी 21जणांचे पॉसिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.आत्तापर्यंत 110 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.तसेच 24 तासांमध्ये 6 जणांचा मूर्त्य झाला आहे.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे.बारामती शहरात आत्तापर्यंत 41 जणांचा मूर्त्य झाला आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी घाबरून न जाता आपआपल्या घरात क्वारटाईन व्हावे.प्रशासन आपल्या सर्वांशी संपर्क साधणार आहे.लक्षण विरहित लोकांनी ऍडमिट होण्यासाठी घाई करू नये तसेच तगादा धरू नये.कृपया प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे.तसेच अद्यापही काही व्यक्ती तोंडाला मास्क लावत नाही, मोकाट फिरताना दिसत आहेत त्यांच्यावर नजर ठेवून कडक कारवाई करण्यात येणार आहे.तसेच सोशल डिस्टनिगचें तंतोतंत पालन करावे.जे लोक कामावर जातात व कामावरून घरी येतात त्यालोकांनी घरातील वयस्कर व्यक्तीच्या संपर्कमध्ये येऊ नये.असे प्रतिपादन डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे.






