Amalner

?️ अमळनेर कोरोनाचा चेंडू “सिमे”पार…अमळनेरकरांची चिंता वाढली…

?️ अमळनेर कोरोनाचा चेंडू “सिमे”पार…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर शहर कोरोना संसर्गाचे माहेर घर ठरले असून कोरोनाचा चेंडू “सिमे” पार गेला आहे.शहराची ओळख कोरोना शहर झाली असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काँटेन्मेंट झोन सोडून आता कोरोनाची लागण पश्चिमेकडून उत्तरेकडे असलेल्या भागांमध्ये झपाट्याने झाली आहे.गेल्या चार दिवसांत रुग्णांची आकडेवारी मोठया प्रमाणात वाढली असून महाराष्ट्रात मुंबई पुणे नंतर अमळनेर शहराचा नं लागला आहे.

काँटेन्मेंट भागाला सोडून थेट उडी कोरोना विषाणूने तांबेपुरा भागात पोहचल्याने पश्चिमेकडून उत्तरेकडे उडी घेतल्याने आता अमळनेरकरांची चिंता वाढली आहे.आतापर्यंत फक्त काँटेन्मेंट भागातील नागरिकांची काळजी होती आता प्रताप मिल कंपाउंड,तांबेपुरा या भागातही कोरोना रुग्ण आढळून आल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

काँटेन्मेंट झोन जवळील सराफ बाजार,कसाली मोहल्ला,पवन चौक ,कासार गल्ली,या भागातही रुग्ण आढळून आले आहेत. ह्या जुन्या भागांमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. हा सर्व भाग अत्यन्त कॉन्झस्टेड असून घरे अगदी एकमेकांना लागून आहेत.त्यामुळे कोरोना विषाणूची लागण लवकर पसरत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 157 इतकी झाली आहे तर फक्त अमळनेरची ही संख्या 100 वर पोहचली आहे. तर जिल्ह्यातील 157 पैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

अमळनेर प्रशासन या बाबतीत अपयशी ठरले असून गेल्या महिन्या भरात मेरी मर्जी प्रमाणे कारभार चालू असल्याने कोरोना चा चेंडू “सिमे पार ” झाला आहे.लोक प्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता प्रशासन अति आत्मविश्वासाने एकटेच वाटचाल करीत आहे. सोशल लोकांना विश्वासात न घेतल्याने असोशल लोकांनी पदांचा गैरवापर करत मन मर्जी प्रमाणे कारभार चालविला त्याचा भुर्दंड अमळनेर करांना भोगावा लागत आहे.

अमळनेर शहराला एक सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक ,ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.आजपर्यंत शहरात अनेक संकटे आली पण एकजुटीने या शहराने या संकटाना पळवून लावलं आहे.आताही एकजुटीने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकत्र येऊन जबाबदारीने नियमांचे पालन करत समन्वय साधून यावर अमळनेरकर मात करतील यात शंका नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button