?️ अमळनेर कट्टा…अमळनेर शहर कडकडीत बंद
अमळनेर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढते रूग्ण या पार्श्र्वभूमीवर उपविभागीय अधिकारी व अमळनेर शहर व्यापारी महासंघाकडून दर सोमवारी जनता कर्फ्यू जाहीर केला असून सोमवारी सकाळपासून शहरातील सर्व दुकाने,बाजारपेठ, भाजीपाला मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी केलेला एक दिवसीय बंद कित पत उपाय कारक आहे यात शंका आहे.
शहरात सर्वच लोक नियमांचे पालन करून कोरोना ला हरविण्याचा प्रयत्न करत आहेत. लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी आपल्या परीने एक दिवस आठवडा बाजार बंद ठेवून सहकार्य करीत आहेत.
बंद मधून वैद्यकीय सेवा,औषधी दुकाने व दूध डेअरींना वगळण्यात आले आहे.
परंतु सर्वच जण नियमांचे पालन करत आहेत का आणि जे करत नाहीत त्यांच्या वर प्रशासन काय कार्यवाही करत आहे हे देखील पाहणे आवश्यक आहे.







