Kolhapur

माजी विद्यार्थ्याचा अनोखा उपक्रम ,शाळेस ग्रंथ प्रदान !

माजी विद्यार्थ्याचा अनोखा उपक्रम ,शाळेस ग्रंथ प्रदान !

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : ६फेब्रुवारी२०२१ रोजी प्राथमिक केंद्रशाळा मिणचे खुर्द येथे ग्रंथ प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला. निमित्त होते शाळेच्या शताब्दी वर्षकार्यक्रमाचे.प्राथमिक केंद्रशाळा मिणचे खुर्द ही शाळा सन२०२१मध्ये शंभर वर्षे पूर्ण करते आहे, याचे औचित्य साधून या शाळेचे माजी विद्यार्थी, प्रसिद्ध लेखक प्रा.श्री. सुनील रंगराव देसाई यांनी जवळपास१००००रु किंमतीची पुस्तके शाळेस प्रदान केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करवीर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.एम.कासार होते.कार्यक्रमाचे संयोजन शाळा शताब्दी महोत्सव समिती मिणचे खुर्द यांनी केले. या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री. किशोर कासार यांनी केले. शाळेतील पदवीधर शिक्षक श्री. खाडे याप्रसंगी सुनिल देसाई यांचे आभार व्यक्त केले. या सोहळ्यानिमित्त बोलताना श्री सुनील देसाई यांनी सांगितले की त्यांच्या जीवनात पुस्तकांमुळेच कसा बदल होत गेला, तसेच या व्यासंगाची सुरवात बाल वयातच घडली,या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी,जोपासावी अशी प्रांजळ इच्छा व्यक्त केली.
यानंतर प्रमुख पाहुणे विश्वास सुतार यांनी आपले विचार व्यक्त केले,ते म्हणाले की
शतेषु जायते शूरः
सहस्त्रेषु च पण्डितः |
वक्ता दशसहस्त्रेषु |
दाता भवति वा न वा ||
या सुभाषितानुसार या ग्रंथदानानिमित्त सुनिल देसाई यांचे कौतुक केले.
कार्यक्रम प्रसंगी आ. आर.व्ही.देसाई यांनीही देसाई सरांना शुभाशीर्वाद दिले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कासार यांनीही वाचन संस्कृती बद्दल आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की आज भौतिक संपन्नतेइतकीच किंबहुना त्याहूनही जास्त वैचारिक संपन्नता असावी.व्यक्तीच्या सुखी असण्याचे,संपन्न असण्याचे मापदंड हे ग्रंथसंपदे नुसार ठरवणे अधिक आवश्यक आहे.
तसेच यानिमित्ताने त्यांनी शतक महोत्सवाच्या कार्यक्रमाची वाटचाल विशद केली,येथून पुढे शाळेचा कायापालट करण्यासाठी सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीने व सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
सरतेशेवटी शाळेतील शिक्षक श्री. शिवाजी देसाई यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानून, कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button