Patur

पातुर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या भंडाराज बु. येथे अजय सुरवाडे यांने गळफास लावून केली आत्महत्या

पातुर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या भंडाराज बु. येथे अजय सुरवाडे यांने गळफास लावून केली आत्महत्या

पातुर… विलास धोंगडे

तालुक्यातील भंडाराज बु. येथील 35 वर्षीय अजय सुरवाडे याने पिकप मालवाहू गाडी कॅनरा बँक लोन वर घेतली असता गेल्या काही दिवसापासून कोरोना भयावह व महामारी मुळे गेल्या काही दिवसापासून लाॅक डाऊन असल्याने . अजय हा आर्थिक स्थिती गंभीर झाल्याने अजय याने गाडी फायनान्स व गाडीच्या कर्ज असल्याने व दुसरा व्यवसाय नसल्याने त्यांना उपवास मारीची पाळी आल्याने अजयने काळजी घेऊन आपल्या घरात सकाळी ५.३० वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.

अजयचा मुलगा मुलगी व पत्नी असा परिवार असून भंडाराज बु या गावांमध्ये सगळीकडे दुःखाचे सावट पसरले आहे. पातूर पोलिस स्टेशनच्या वतीने अजय या मृतक इसमाचा पंचनामा करून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे व पुढील तपास पातूर पोलिस करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button