कोरोना निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : परत एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने व पुन्हा एकदा काही भागात लाँक डाउन होण्याच्या मार्गावर दिसत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण दिसत असल्याने पुन्हा गावाकडे येण्याच्या तयारीत दिसत आहेत त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर कडक बंदोबस्त केला आहे सिमेवरती याठिकाणी महाराष्ट्रातुन कर्नाटकात कोणी येत असेल तर मुंबई पुणे येथील नागरिक हे येते वेळेस कोरोना निगेटिव्ह ७२ तासाची रिपोर्ट असावी अन्यथा तेथून वापस पाठवीण्यात येत आहे व सिमेवरती एक डॉक्टर ची टिम ने येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची टेंपरेचर चेक, आँक्सीजण चेक करून काही दिसत नसल्यास पाढवत आहेत काही आढळल्यास तात्काळ त्यांना १५ दिवस कोरेटाईन ठेवण्यात येणार आहे.
यावेळी हुलसूर तहसीलदार शिवानंद म्हेत्रे, नायबतहसिलदार संजुकुमार बहिरे, गिरदावर मैनेश स्वामी डॉ बिरादार, डॉ संतोष व पोलीस शिबंदी होते.






