शिवाजी पुस्तकाचे प्रकाशनाचे निषेधार्थ मा. उपविभागीय अधिकारी तहसीलला निवेदन
ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर तालुका कांग्रेस कमेटी व महाविकास आघाडी च्या वतीने आज का शिवाजी पुस्तकाचे प्रकाशनाचे निषेधार्थ मा. उपविभागीय अधिकारी तहसील चिमूर यांच्या मार्फत मा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे आज का शिवाजी या पुस्तकात महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करण्यात आली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रकार आहे. महापुरुषांची बरोबरी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता करू शकत नाही. महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांचे या पुस्तकाच्या प्रकाशनाने मन
दुखावले गेले आहे. या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाने सर्व भारतवासी व महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी.
राज्य सरकारने हे पुस्तक
महाराष्ट्रात प्रकाशित करू नये. केंद्र सरकारने या पुस्तकावर तात्काळ बंदी
आणून लेखकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुका कांग्रेस कमेटी चिमूर व महाविकास आघाडी करीत आहे.
निवेदन देतांना माधवभाऊ बिरजे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी चिमूर, अनिलभाऊ डगवार माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख, राजूभाऊ मुरकुटे उपजिल्हाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस, विजय डाबरे, उपाध्यक्ष तालुका कांग्रेस, योगेश ठूणे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य, ओम खैर माजी पंचायत समिती सदस्य, तुषार शिंदे उपनगराध्यक्ष चिमूर, विनोद ढाकूणकर नगरसेवक, धनराजजी मालके जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ता, अॅड. दुधनकर नगरसेवक, तुषार काळे नगरसेवक चिमूर, धनंजय बिंगेवार कांग्रेस कार्यकर्ता, मंगेश बारापात्रे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, विनोद राऊत अध्यक्ष एससी विभाग, संदीप रामगुंडे जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता, राजू चौधरी उपाध्यक्ष तालुका कांग्रेस, संजय पडोळे शिवसेना उपशहर प्रमुख इ उपस्थित होते.






