लोण सिम येथील महिलेचा अपघाती मृत्यू
नूर खान
मारवड हद्दीतील लोण सिम या गावातीस शिवारात विहीरवर पिण्याचे पाण्यासाठी गेली असता बाई नामे रेशमा आभा धनगर वय-४०,रा. चिंचवे ता.जि.धुळे ही महिला पाय घसरुन पडल्याने मयत झाल्याची खबर पोलीस पाटील यांनी दिली असुन राहुल फुला सपोनि यांनी स्वत: भेट दिली व तिचा भाऊ बाबु सहादु व्हडगर याची खबर घेतली असता तिचे पश्चात पती अक मुलगा, चार मुली असा परिवार आहे. अ.मृ.दाखल करुन घेवुन पुढील तपास राहुल फुला यांचे मार्गदर्शनाखली पोना.१६९३ विशाल चव्हाण, पोहवा.२३९५ प्रकाश साळुंखे, पोना.२७७ कुलकर्णी दिनेश हे करीत आहोत.






