Amalner

आधार बहुउद्देशीय संस्था व आवास फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने अंदरपुरा मोहल्ला क्लिनिक चे उद्दघाटन संपन्न…विप्रो कंपनीचे मोलाचे सहकार्य..

आधार बहुउद्देशीय संस्था व आवास फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने अंदरपुरा मोहल्ला क्लिनिक चे उद्दघाटन संपन्न…विप्रो कंपनीचे मोलाचे सहकार्य..रजनीकांत पाटीलअमळनेर ( प्रतिनिधी ) शहरातील आधार बहुउद्देशीय संस्था च्या वतीने व आवास फाऊंडेशनच्या प्रयत्नाने अंदरपुरा मोहल्ला येथे दि १ सप्टेंबर रोजी विप्रो केअर्स सहायाने आधार शहरी आरोग्य प्रकल्पचा मोहल्ला क्लिनिक चे उद्घाटन तहसीलदार म मिलींद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तर मुख्याधिकारी म डाँ विद्या गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भारती पाटील कार्याध्यक्ष रेणुका प्रसाद, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे,न पा प्रशासन अधिकारी संजय चौधरी,मेडिकल आफिसर डाँ बडगुजर, सह आदि मान्यवर उपस्थित होते.विप्रो कंपनीचे मालक आदरणीय अजीम प्रेमजी यांच्या मार्फत अमळनेरकराना मागील पाच वर्षांपासून आरोग्याची मोफत सेवा मिळत आहेत आणि कोविड १९ या महामारीत साबुन वाटप सह देशभर अनेक सामाजिक कार्य सुरू आहे असे आधार संस्था अध्यक्ष भारती पाटील यांनी सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार मिलींद वाघ व मुख्याधिकारी म डाँ विद्या गायकवाड यांनी मोहल्यातील नागरिकांना आव्हान केले की विप्रो केअर्स,आधार संस्था आणि आवास फाउंडेशन यांच्या ह्या शहरी प्रकल्प ( दवाखाना ) च्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा व कोरोना चे संसर्ग होऊ नये म्हणून मास्क, सेनिटायझर, सोशल डिस्टंनसिंग चा उपयोग करावा असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थितीतांचे आवास फाउंडेशनच्या वतीने अंदरपुरा मोहल्ला पंच कमिटीचे इक्बाल शेख, सैय्यद मुबारक अली, नबी सैय्यद,व जेष्ठ नागरिक अमानोदीन, एजाज शेख, मुशीरोदीन मुल्लाजी, करिम खा, मुबिनोदीन, मसुदखा इब्राहिमखा,यांचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जावेद अख्तर सर यांनीकेले कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी अशफ़ाक शेख, नविद शेख, अहेमद अली सैय्यद,मजहर शेख, जमालोदीन, जाविद पेंटर, जाकिर पठान, अंजुम पठान, सह आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button