N.P.S प्रक्रिया थांबविण्यासाठी राज्य कर्मचार-यांचा एल्गार.
राष्ट्रीय ओ.बी.सी. कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर यांचे कडुन मुख्यमंत्र्यांना निवेदन
मा.ना.मुख्यमंत्री , म.रा,
मा.ना. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री व शिक्षक आमदार मा.कपील पाटील व मा.ना.गो.गाणार यांना मा.उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत निवेदनाव्दारे मागणी केली आले.
चिमुर : १ नोव्हेंबर २००५ पुर्वी च्या राज्य सरकारी कर्मचार-यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली. परंतु त्यानंतरच्या राज्य सरकारी कर्मचार-यांना जुनी पेंशन योजना नाकारुन नविन अंशदायी पेंशन योजना(D.C.P.S)सुरू करण्यात आली. त्यासाठी अनेक वर्षा पासुन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रस्त्यावर आले आहे, आंदोलने झाली आहे. अंशदायी पेंशन योजनेचा (D.C.P.S) कोणत्याही प्रकारचा हिशोब व शंकेचे निरसन न करता N.P.S. प्रक्रिया लादण्यात आली. मागील १५ वर्षात मृत झालेले कर्मचार-यांना अजुनही (DCPS) कपातीचा रक्कम व हिशोब मिळाला नाही. त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. ही योजना लागु करतांना या योजनेचे अचुक मार्गदर्शन करण्यात यावेयावे व जबरदस्ती ने लादण्यात येऊ नये. N.P.S. योजने बाबत शंका निरसन करण्यात यावे. राज्य सरकारी कर्मचार-यांना अंशदायी पेंशन योजनेतील कपात रक्कम व शासनवाटा यांचा हिशोब न देता सरसकट N. P. S योजना लादण्यात आली. ही प्रक्रिया थांबविण्यात यावी व हक्काची जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओ बी सी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर यांनी केली आहे.
यावेळी निवेदन देतांना शिष्ठमंडळात राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हा मार्गदर्शक- श्री.अशोकरावजी वैद्य, सहसचिव- रामदास कामडी, कोषाध्यक्ष-कवडूजी लोहकरे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ चिमूर शाखेचे अध्यक्ष श्री.राजेन्द्र शेन्डे,श्री.मनोज कामडी,श्री.रविंद्र ऊरकूडे, श्री. प्रभाकर लोथे, श्री .अमित लवनकर,श्री.ताराचंद बोरकूटे, श्री.दिलीप डूकरे आदी पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.






