Amalner

एक हाथ मदतीचा…पूरग्रस्तांना कृषिभूषण साहेबराव पाटील आणि न प तर्फे एकूण 72 हजाराची मदत..मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम..

एक हाथ मदतीचा…पूरग्रस्तांना कृषिभूषण साहेबराव पाटील आणि न प तर्फे एकूण 72 हजाराची मदत..मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम..

अमळनेर कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले
आहेत, अनेकांच्या कुटूंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल
असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, अभिष्टचितन करण्यासाठी
कुणीही प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नयेत सोशल मिडीया व
ई मेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्विकारु शिवाय राज्यात कोरोनाचे संकट
कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यताही वैद्यकीय तज्ञांनी व्यक्ती केली
आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. कुठलेही
जाहिर कार्यक्रम करु नयेत.

पूर, आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे,
त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये आपले योगदान देवून
सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मा. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी केले आहे.

२७ जुलै , रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव इाकरे यांचा वाढदिवस असला तरी
या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा आवाहनास पतिसाद देत मा.आ. कृषिभूषण
साहेबराव पाटील यांनी रुपये ५१ हजार आणि मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.
पुष्पलता पाटील यांनी नगर परिषदेतर्फे रुपये २१ हजाराचा धनादेश मा. सीमा
आहिरे, विभागीय अधिकारी, अमळनेर भाग अमळनेर यांचेकडे देतांना मा.आ.
कृषिभूषण साहेबराव पाटील, मा. प्रशांत सरोदे मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद,
श्री. संजय चौधरी, श्री. विक्रांत पाटील, संदिप गायकवाड, मा. संजय पाटील
(भूतबापू), डॉ. राजेंद्र पिंगळे, श्री. सुरेश पाटील, सरपंच सुंदरपट्टी आदी.उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button