पडस्थळमध्ये भव्य तिळगूळ समारंभ संपन्न
दत्ता पारेकर पुणे
पुणे : मकर संक्रांतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील पडस्थळ या गावी महिलांसाठी खास भव्य तिळगूळ समारंभाचे आयोजन केले होते. रेडके परिवारातर्फे प्रतिवर्षी हा का कार्यक्रम राबवण्यात येतो. यंदाचे हे पाचवे वर्ष होते.
गावातील कष्टकरी, विधवा, गरीब, स्वाभिमानी महिलांच्या करता या उत्सवाचे विशेष आयोजन करण्यात येते, एकमेकांचे आचार- विचार,संस्कार समजावेत, एकमेकांना भेटता यावे, प्रत्येकाचा सन्मान व्हावा हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून रेडके परिवार या कार्यक्रमाचे आयोजन करतो.
यंदाच्या कार्यक्रमात महिलांसाठी समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते.इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या व मा. सभापती पुष्पा रेडके यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या उपक्रमास गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तिळगुळा सोबतच विविध मनोरंजन खेळ, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची यासारख्या खेळांचा महिलांनी यावेळी आनंद लुटला असल्याचे पुष्पा रेडके यांनी सांगितले आहे.







