Khirdi

खिर्डी खु.येथे बलवाडी रोड वर घाणी चे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोकयात.

खिर्डी खु.येथे बलवाडी रोड वर घाणी चे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोकयात.

खिर्डी ता. रावेर भीमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील खिर्डी खु. येथील नवीन गावठाण गट नंबर १२१ बलवाडी रोडवर गावातील पशुपालक सडका पाला पाचोळा व मल मुत्र तसेच घरातील ओला व सुका कचरा रस्त्यावर टाकल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्या चे मोठे मोठे ढिग तयार झाल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोकयात आलेले असून सध्या या परिसरात दुर्गंधी पसरल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असून रस्त्याच्या बाजुला असलेल्या घाणी मुळे वाहन धारकांना साईड देण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने सदर ठिकाणी अपघात घडण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. या बाबत ग्राम पंचायत प्रशासनास व वारं वार लेखी व तोंडी कळवून सुध्दा अश्या गंभीर समस्या कडे दुर्लक्ष करीत आहे.घाणी मुळे विषाणू जन्य रोगराई पसरणयाची दाट शक्यता नाकारता येत नाही तरी सुध्दा ग्राम पंचायत प्रशा सनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ग्राम पंचायती च्या कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.घाणीचा कचरा त्वरित स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button