शहीद’ महाविद्यालयाला कराटे मध्ये सुवर्ण,पदक
कोल्हापूर ः आनिल पाटील
निपाणी येथे झालेल्या ७ व्या राज्य कराटे चॅम्पियनशीप’मध्ये शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बाजी मारली. या स्पर्धेचे आयोजन ‘शोतोकान कराटे डो- असोसिएशन’तर्फे करण्यात आले होते. ही स्पर्धा २८डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आली होती.
या झालेल्या स्पर्धेत शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य ही पदे मिळविली. यामध्ये बी. एसी. आय.टी च्या रोशनी कुंभार हिने सुवर्ण पदक, रोशनी पाटील हिने रौप्य पदक तर सायली चौगले हिने सुवर्ण पदक मिळवले. बी.सी.ए पहिल्या वर्षातील विद्यार्थिनींनी विद्या मगदूम हिने सुवर्ण पदक तर साक्षी पाटील हिने रौप्य पदक मिळविले. तसेच बी.सी.ए.तील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनी शिवानी भोपळे हिने रौप्य आणि कास्य, शिवानी कोळी हिने सुवर्ण, वैष्णवी पाटील हिने सुवर्ण तर काजल कांबळे हिने रौप्य पदक पटकावले. या यशासाठी शहीद प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई सीताराम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष चौगले तर उपप्राचार्य राहुल कांबळे याचे प्रोत्साहन लाभले. तसेच वैभव अस्वले, सिद्धी वरुटे, अरुणा शिंदे, विजय पाटील या कराटे शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. या यशा बद्दल राधानगरी परिसरातून सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केलं जातं असून भावी वाटचालीस शूभेच्छा दिल्या जात आहेत.






