Pune

बळीराजा हवालदिल. रब्बी हंगाम संकटात…

बळीराजा हवालदिल. रब्बी हंगाम संकटात…

दत्ता पारेकर
पुणे.. पुणे जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे शेतकरी राजा संकटात सापडल आहे. आधीच खरिप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. त्यातुन शेतकरी सावरत असताना खरिपाचे नुकसान रब्बीमध्ये भरून काढु या आशेने शेतकरी कष्ट करीत असताना ढगाळ वातावरणामुळे ही अशा फेल ठरताना दिसत आहे.
गहु हरभरा या पिकांसाठी लागणारी थंडी गायब झालेली आहे. तसेच या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष व डांळीब चे शेतकरी ही धास्तावले आहेत.. वातावरण योग्य नसल्याने अॉक्टोंबर मध्ये हंगाम लांबणीवर गेला होता..
या वातावरणाचा परिणाम दुभत्यापशुधननावरतीही पाहिला मिळत आहे.
या ढगाळ वातावरणामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे अशी भिती शेती तज्ञांनी व्यक्त केली आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button