Pune

कर्मवीर पुरस्काराने डॉ. वडगांवकर सन्मानीत

कर्मवीर पुरस्काराने डॉ. वडगांवकर सन्मानीतराहुल खरातपुणे ; प्रतिनिधी / पुणे-राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध होमीओपँथी व योगशास्त्र विशेषज्ञ प्रा.डॉ.प्रल्हाद वडगांवकर ,पुणे यांचा नुकतेच दि.22.12.2019 रोजी नगर येथे ओबीसी सेवा संघा तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप ढोबळे यांचे शुभहस्ते 10व्या अधिवेशनात कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमीओपँथी क्षेत्रात डॉ. वडगांवकर सन 1966 पासून कार्यरत आहेत.त्यानी होमीओपँथी ,अध्यापन ,उपचार,संशोधन, ग्रंथलेखनाचे कार्य केले असून होमीओपँथी मेडीकल कॉलेज प्राचार्य,हॉस्पिटल सुपरिटेडन्ट पदी उत्तम काम केले आहे.दि.होमीओपँथीक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव ,राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी देखील उत्तम काम केले आहे.ते 1985 पासून डॉ. प्रल्हाद वडगांवकर समाज सेवा ट्रस्टच्या माध्यमातुन होमीओपँथी उपचार,व्यसनोपचार, झोपडपट्टी आरोग्य सुधारणा, राष्ट्रीय एकात्मता शिबीरे त्यांनी आयोजित केली आहेत. सन 1980 पासून मंडल आयोग मंजूरिसाठी त्यांनी 13 वर्षे आंदोलने केली असुन ओबीसी आरक्षण बचाव ,सामाजिक न्यायासाठी विविध उपक्रम वय वर्ष 84 आहे तरी ते राबवित असून आजही संविधान जागृती ,सर्व समभाव, जाती निर्मूलन,प्रबोधन कार्य,तसेच सर्व जातीय ,धर्मीय पुनर्विवाह इच्युकांचा मेळावा कायम भरवित असतात. या पूर्वी डॉक्टरांना जीवन गौरव,ओबीसी भूषण, समाजरत्न व कार्यक्षम योगशिक्षक ,सर्वात्कृष्ठ होमीओ ग्रँथ लेखन पुरस्कार मिळाले आहेत. डॉक्टरांच्या विविध क्षेत्रातील प्रदीर्घ कार्याची दखल घेऊन त्यांना ‘कर्मवीर’ पुरस्काराने ओबीसी सेवा संघाने सन्मानित केले आहे.या कार्यक्रमास राष्ट्रीय ओबीसी संघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक,प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप ढोबळे,कार्यध्यक्ष नरेंद्र गद्रे,महासचिव द्यानदेव खराड़े, प्रा.डी. ए. दळवी ,सचिन गुलदगड,दै. लोकमन्थन चे संपादक अशोकजी सोनावणे माजी महापौर फुलसुन्दर ,समता परिषदेचे अंबादास गारुडकर व ओबीसी नेते आणि हजारों कार्यकर्ते मोठ्या संख्येने अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button